सूरज यादव
गेल्या काही महिन्यात पडझडीनंतर सावरलेला शेअर बाजार पुन्हा कोसळलाय. दरम्यान, सेन्सेक्स १ लाख अंकावर जाईल असा अंदाज वर्तवला जातोय.
शेअरबाजारात मोठी घसरण ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली होती. तेव्हा कुणीही सेन्सेक्स १ लाखावर जाईल असं म्हटलं नव्हतं. त्यानतंर बाजारात तेजी आली आणि ६ टक्के रिटर्न मिळाला.
ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टेनलीने डिसेंबर २०२५ पर्यंत सेन्सेक्स १ लाख ५ हजार अंकावर पोहोचेल असा अंदाज वर्तवलाय. मॅक्रोइकॉनिमिक्सची स्टॅबिलिटी, कॅश फ्लो चांगला असल्याचं स्टेनलीने म्हटलंय.
अर्थात मॉर्गन स्टेनली यांनी वर्तवलेला अंदाज हा अमेरिकेत राजकीय उलथापालथ होण्याआधीचा आहे. ट्रम्प सत्तेत येताच त्यांच्या निर्णयाचे परिणाम बाजारावर होत आहेत.
ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टेनलीच्या दाव्यानुसार शेअर बाजार १ लाखांवर जाऊ शकतो. पण त्यासाठी एका वर्षात जवळपास ४१ टक्के वाढ गाठावी लागेल.
स्टेनलीच्या मते, भारतीय शेअर बाजारात धोका पत्करण्याच्या क्षमतेनुसार फळ मिळेल. डिसेंबर २०२५ पर्यंत सेन्सेक्स ९३ हजार पॉइंटपर्यंत आरामात पोहोचू शकतो. सध्याच्या स्थितीपेक्षा हे २५ टक्के जास्त आहे.
धोका पत्करण्याचा फॅक्टर जर प्रमाणापेक्षा जास्त वाढला तर शेअर बाजार कोसळण्याचीही शक्यता आहे. तो ७०००० वरही येऊ शकतो असंही मॉर्गन स्टेनलीच्या हवाल्याने रिपोर्टसमध्ये म्हटलंय.
मॉर्नग स्टेनलीचे इंडिया रिसर्च हेड रिद्धम देसाई यांनी म्हटलं की, मार्केट खालच्या पातळीपर्यंत आलंय. आता ते इथून वरती जाण्याची तयारी करेल. जागतिक मंदीच मार्केटला खाली नेऊ शकते.