मुघल बादशहाचा दाढी ओढून छळ केला, शेवटी मराठ्यांनी जीव वाचवला

सकाळ वृत्तसेवा

मुघल

मुघलांच्या इतिहासामध्ये असा एक मुघल बादशहा होऊन गेला, त्याचा वाईट पद्धतीने छळ झाला.

शाह आलम दुसरा

शाह आलम दुसरा, हाच तो मुघल बादशहा. त्याची दाढी ओढून आणि शरीरावर वाट्टेल तशा जखमा देऊन छळ झाला.

मराठे

शेवटी मराठ्यांनी शाह आलम दुसरा याची सुटका केली आणि त्याला नावापुरतं गादीवर बसवलं.

गुलाम कादिर

गुलाम कादिर नावाच्या एका रोहिल्याने एक फौज जमवून मुघल बादशहाला आव्हान दिलं होतं.

डोळे काढले

गुलाम गादिरनेच शाह आलम दुसरा याचे डोळे काढले आणि शाही महिलांचा वाट्टेल तसा छळ केला.

क्रूर कृत्ये

गुलाम कादीरने केवळ शाह आलमचे डोळेच फोडले नाहीत, तर त्याने बादशहाचा अपमान करण्यासाठी अनेक क्रूर कृत्ये केली.

बादशहा

ज्यात बादशहाची दाढी ओढणे, त्याच्याशी गैरवर्तन करणे आणि त्याला अपमानित करणे.. असे प्रकार केले.

रोहिला सरदार

गुलाम कादीर हा रोहिला सरदार होता. त्याच्यावर बालपणी त्याच्यावर अन्याय झाल्याचे म्हटले जाते आणि त्याचा सूड घेण्यासाठी त्याने शाह आलमवर हल्ला केला.

ताकद

गुलाम कादीरने सैन्य जमवून शाह आलमवर हल्ला केला. सुरुवातीला त्याला पराभव पत्करावा लागला, परंतु नंतर त्याने पूर्ण ताकद एकवटून हल्ला केला.

फितूर

यावेळी शाह आलमचा किल्लेदार फितूर झाल्यामुळे गुलाम कादीरचे सैन्य किल्ल्यात घुसले आणि त्याने शाह आलमला कैद करून स्वतः गादीवर बसला.