सकाळ डिजिटल टीम
शाहरुख खानच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा बंगला 'मन्नत', जो मुंबईच्या समुद्रकिनारी वसलेला आहे. हा बंगला बॉलीवूडच्या वैभवाचं प्रतीक मानला जातो
आता एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे की शाहरुख खान 'मन्नत' काही काळासाठी सोडण्याच्या तयारीत आहे.
शाहरुखने खार-पाली हिल्स येथे दोन आलिशान ड्युप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतले आहेत. हे फ्लॅट निर्माता जॅकी भगनानी आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहेत.
पहिला फ्लॅट जॅकी भगनानी आणि दीप्ती देशमुख यांच्या नावावर असून त्याचे मासिक भाडे ११.५४ लाख रुपये आहे. दुसरा फ्लॅट वासू भगनानी यांच्या नावावर असून त्याचे मासिक भाडे १२.६१ लाख रुपये आहे.
शाहरुख आणि गौरी खान यांनी 'मन्नत'च्या विस्तारासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगी मागितली आहे.
'मन्नत' ही ग्रेड III हेरिटेज इमारत असल्यामुळे त्याच्या पुनर्बांधणीसाठी विशेष परवानगी आवश्यक आहे. या परवानगी नंतर मे महिन्यात काम सुरू होईल.
शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाचे हे स्थानांतर कायमस्वरूपी नसेल, ते फक्त मन्नतच्या विस्तारासाठी काही काळासाठी होईल.
शाहरुख खान सध्या सिद्धार्थ आनंदच्या 'किंग' चित्रपटावर काम करत आहे आणि लवकरच त्याच्या आगामी सिनेमांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.