'ओम शांती ओम' सिनेमातील गाण्यासाठी शाहरुखने कलाकारांना दिले महागडे गिफ्ट

सकाळ डिजिटल टीम

ओम शांती ओम

२००७ साली रिलीज झालेला 'ओम शांती ओम' सिनेमा खूप गाजला. दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती.

सिनेमा सुपरहिट

हा सिनेमा त्यावेळी सुपरहिट झाला होता. ४० करोड बजेट असलेल्या या सिनेमाने त्यावेळी १५२ करोड रुपयांची कमाई केली होती.

अनेक कलाकारांच्या भूमिका

या सिनेमात अनेक कलाकारांनी छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. अलीकडेच एका मुलाखतीत तब्बूने हा चित्रपट रिलीज होऊन तब्बल १७ वर्षांनी याबाबत एक नवीन गोष्ट शेअर केली. अभिनेत्रीने सांगितले की तिचे बरेच चाहते तिला शाहरुख खानसोबत पाहण्यासाठी आतुर होते. नेमकी त्याचवेळी तिला या गाण्यासाठी संधीही मिळाली.

गाजलेलं गाणं

या सिनेमातील गाणं म्हणजे 'दिवानगी'. शाहरुख आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं.

हे कलाकार सहभागी

सलमान खान, सैफ अली खान, संजय दत्त, विद्या बालन, तब्बू, रेखा, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, सुष्मिता सेन, शबाना आझमी, प्रियांका चोप्रा, धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती हे कलाकार या गाण्यात दिसले होते.

महागडं गिफ्ट

चित्रपटाच्या दिग्दर्शिका फराह खानसाठी तिने या गाण्यात सहभाग घेतला असल्याचेही तब्बूने सांगितलं तर शाहरुखने या गाण्यात सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराला महागडं गिफ्ट दिल्याचं तिने सांगितलं.

संपूर्ण बॉलिवूड एकत्र

आता हे गिफ्ट काय होतं याचा खुलासा तिने केलेला नसला तरीही या गाण्याच्या निमित्ताने संपूर्ण इंडस्ट्री एकत्र आली होती असं म्हणावं लागेल.

एकमेव गाणं

आजही हे गाणं प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असून यानंतर बॉलिवूडमध्ये असा कोणताही प्रयत्न झालेला पाहायला मिळाला नाही.