संतोष कानडे
थोरल्या शाहू छत्रपतींना प्राण्यांवर विशेष प्रेम होतं. त्यांच्याकडे देशभरातले जवळपास सर्वच प्राणि आणि पक्षी होते.
त्यांच्या बागेमध्ये वाघ, चित्ता अशा हिंस्र प्राण्यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे शाहू महाराजांना श्वानांविषयी जास्त लळा होता.
शाहू महाराजांचा लाडका श्वान खंड्या होत्या. एकदा शाहू महाराज शिकारीला गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा खंड्यानेच त्यांचे प्राण वाचवले.
त्यानंतर खंड्याला पालखीचा मान प्राप्त झाला होता. खंड्यावर महाराजांचं जीवापाड प्रेम होतं. त्याच्यासाठी महाराजांनी पाच हजारांचे इनाम लाऊन दिले होतं.
खंड्याच्या मृत्यूनंतर थोरल्या शाहू महाराजांनी विधीवत अंत्यसंस्कार करुन त्याची समाधी 'संगम माहुली' येथे बांधली.
शाहू महाराजांकडे असलेल्या बसंत, बंता, मिठू या कुतेवानांची नावे इतिहासामध्ये आढळतात.
शाहू महाराजांच्या मृत्यूच्या चार महिने आधी नानासाहेब पेशव्यांनी महाराजांसाठी २४ अतिउत्तम जातीचे कुत्रे देशभरातून मागवले होते.
थोरल्या शाहू महाराजांनी कायम प्राणी-पक्षांवर जीवापाड प्रेम केलं. इतिहासामध्ये त्याच्या नोंदी आहेत.
लाडक्या श्वानाची समाधी बांधणारे छत्रपती शाहू महाराज हे एकमेवाद्वितीय आहेत.