सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री शर्वरी वाघ आता एका दमदार ॲक्शन स्टार म्हणून दिसणार आहे. ती वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या आगामी ‘अल्फा’ चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
शर्वरी वाघने तिच्या फिटनेसचा एक झलक सोशल मीडियावर शेअर केला आहे. समुद्रकिनाऱ्यावर टायर फ्लिप वर्कआउट करतानाचे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना खूप प्रेरणा मिळाली आहे.
तिच्या सिक्स-पॅक ॲब्स आणि टोंड बॉडीमुळे शर्वरी वाघ आता बॉलीवूडच्या टॉप ॲक्शन स्टार्समध्ये सामील होण्याच्या दृष्टीने चर्चेत आहे.
शर्वरीचा दमदार ॲथलेटिक लूक आणि वर्कआउटमधील अष्टपैलुत्व यामुळे ती बॉलीवूडमध्ये एक उंची गाठण्याच्या मार्गावर आहे.
शर्वरीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "चांगल्या बीच वर्कआउटला कधीच कंटाळा येत नाही." तिच्या या पोस्टने चाहते आनंदित झाले आहेत.
शर्वरी वाघ या चित्रपटात बॉलीवूड सुपरस्टार आलिया भट्टसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.
'अल्फा' हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘मुंज्या’ आणि ‘महाराज’सारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर शर्वरीने आता एक्शन आणि फिटनेससाठी तयारी केली आहे.