Shubham Banubakode
2002 मध्ये ‘कांटा लगा’ या म्युझिक व्हिडिओने शेफाली जरीवालाला रातोरात स्टार बनवले. या गाण्याने तिला ‘कांटा लगा गर्ल’ ही ओळख मिळवून दिली.
शुक्रवारी रात्री शेफाली जरीवालाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. वयाच्या 42व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला.
मीडिया रिपोर्टनुसार, शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती सुमारे 1 मिलियन डॉलर (अंदाजे 8.54 कोटी रुपये) होती. ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरी तिची ब्रँड व्हॅल्यू कायम होती.
शेफाली जरीवाला एका 35 ते 40 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी 10 ते 25 लाख रुपये फी आकारत होती. तिची लोकप्रियता आणि ब्रँड व्हॅल्यूमुळे ती इव्हेंट्स आणि शोजमधून मोठी कमाई करत होती.
‘कांटा लगा’ गाण्यासाठी शेफालीला केवळ 7 हजार रुपये मानधन मिळाले होते. या गाण्याच्या यशानंतर तिची फी लाखोंपर्यंत पोहोचली. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या.
शेफालीने ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत काम केले. तसेच रिअॅलिटी शोजमधून लोकप्रियता मिळवली.
शेफालीचे इन्स्टाग्रामवर 3.3 मिलियन फॉलोअर्स होते. ब्रँड एंडोर्समेंट आणि स्पॉन्सर्ड पोस्ट्सद्वारे ती दरवर्षी 2.6 ते 3.3 कोटी रुपये कमावत होती.