सूरज यादव
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केलीय. यात ७ पद्मविभूषण, १९ पद्म भूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या या पुरस्काराने शेतकऱ्यांपासून ट्रॅव्हल ब्लॉगर ते योगा ट्रेनर्सना सन्मानित करण्यात येणार आहे.
कुवैतच्या योगा ट्रेनर शेखा ए जे अल सबाह यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी महिन्याभरापूर्वीच त्यांची भेट घेतली होती.
अल सबाह यांनी दारात्म नावाची संस्था स्थापन केलीय. कुवैतमधला हा पहिला परवानाधारक योगा स्टुडिओ आहे.
अल सबाह यांनी आखाती देशात आधुनिक पद्धतींसह योगाला प्रोत्साहन दिलं. त्यांनी शम्स यूथ योगाची स्थापनाही केलीय.
शम्स यूथ योगा शून्य १४ वयोगटातील मुलांना एक अभ्यासक्रम शिकवते. याशिवाय कुवैतमधील वंचितांना शैक्षणिक साहित्यसुद्धा दिलं.
शेखा ए जे अल सबाह या ४८ वर्षांच्या आहेत. मेडिसिन (योग) वर्गात त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येईल.
योग आणि फिटनेससाठी शेखा ए जे अल सबाह यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान मोदींनीही कौतुक केलं होतं.
कुवैतमध्ये शेखा ए जे अल सबाह यांच्या प्रयत्नांमुळे योग आणि निरोगी जीवनशैलीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे.