सकाळ डिजिटल टीम
काल चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला ६ विकेट्सने पराभूत केले.
पण कालच्या सामन्यात भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन चर्चेत राहिला.
कालच्या सामन्याला मिस्टर आयसीसी म्हणजेच शिखर धवनने प्रमुख पाहुणा म्हणून सामन्याला उपस्थिती लावली होती.
पण धवन चर्चेत येण्याच कारण म्हणजे त्याच्या सोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल.
धवनचा या आयरीश तरुणीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या आयर्लंडमधील तरूणीचं नाव सोफी शाईन आहे.
ती यूएयीमधील एका कंपनीमध्ये प्रोडक्ट कंसल्टंट म्हणून काम करते.
धवनसोबत ही तरूणी मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये देखील दिसली होती.
त्यामुळे तरूणी कोण असून तिचे धवनसोबत काय नाते आहे? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.