फक्त गाण्याची नाही तर चाहत्यांना तिच्या सौंदर्याचीही भुरळ

आशुतोष मसगौंडे

तरुणांच्या मनावर राज्य

शर्लीने अगदी लहान वयातच सोशल मीडियावर तरुणांच्या मनावर राज्य निर्माण केले आहे. शर्ली सेतियाचा जन्म 2 जुलै 1995 रोजी भारतातील दमण येथे झाला.

shirley setia | Esakal

ऑकलंड विद्यापीठातून पदवी

जन्मानंतर शर्ली तिच्या पालकांसह न्यूझीलंडला गेली. त्यानंतर शर्लीने तिथंच शिक्षण पूर्ण केलं. शर्लीने न्यूझीलंडच्या ऑकलंड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.

shirley setia | Esakal

'सनम रे'

इंडो-किवी गायिका शर्लीने हिंदीत गायलेली गाणी यूट्यूबवर चांगलीच हिट झाली आहेत. 'सनम रे' हे गाणे त्यापैकीच एक.

shirley setia | Esakal

यूट्यूब सेन्सेशन

यूट्यूब सेन्सेशन शर्ली सेटियाने आपल्या क्यूटनेसने सर्वांची मने जिंकली आहेत. शर्ली अभिनयासोबतच खूप चांगली गायिकाही आहे.

shirley setia | Esakal

'मस्का'

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या 'मस्का' या चित्रपटातून शर्लीने चित्रपटांमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. ती शिल्पा शेट्टी आणि अभिमन्यू दासानीसोबत 'निकम्मा' चित्रपटातही आहे.

shirley setia | Esakal

'पाजामा पॉपस्टार'

शर्लीने टी-सीरीजने आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेतला आणि तिच्या बेडरूममधून पायजामा घातलेल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. ती या स्पर्धेची विजेती होती आणि तिला न्यूझीलंड हेराल्डने 'पाजामा पॉपस्टार' असे टोपणनाव दिले.

shirley setia | Esakal

पहिले गाणे

शर्लीने वयाच्या १६ व्या वर्षी युट्यूबवर पहिले गाणे अपलोड केले होते. यानंतर हळूहळू तिने यूट्यूबवर आणखी गाणी अपलोड करायला सुरुवात केली.

shirley setia | Esakal

नॅशनल क्रश

'आशिकी 2' मधील 'तुम ही हो' हे गाणे त्यावेळी खूप प्रसिद्ध झाले होते आणि शर्लीने तेच गाणे स्वतःच्या शैलीत गायले आणि रातोरात नॅशनल क्रश बनली.


अभिनेत्री वैदेही परशुरामीचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Actress Vaidehi Parashurami's new movie