Saisimran Ghashi
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडपासून १३ किमीवर, पुणे-बंगळुरू महामार्गाजवळ वसंतगड आहे. तळबीड हे गडाच्या पायथ्याचं गाव.
छत्रपती शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि ताराबाई यांचं मूळ गाव इथलंच. गडाचं महत्त्व शिवकालापासून सुरू होतं.
पूर्वी डोंगर चढून जावं लागे, आता ग्रामस्थांनी बांधलेल्या १५० पायऱ्यांमुळे गडावर जाणं सोपं झालं आहे.
गडावर शेंदरी रंगाची श्रीगणेशाची मूर्ती, छोटं शिवमंदिर आणि चंद्रसेन महाराजांचं प्राचीन भव्य मंदिर आहे.
रामायण काळात राम-लक्ष्मण इथे थांबले. लक्ष्मणाच्या खड्गामुळे चंद्रसेनचे हात तुटले, पण त्यांनी तपश्चर्या पूर्ण केली.
आजच्या मूर्तीमागे असलेल्या पुरातन मूर्तीचे दोन्ही हात तुटलेले आहेत. आख्यायिकेचं प्रत्यक्ष पुराव्यासारखं!
चैत्र महिन्यात मोठी जत्रा भरते. या काळात जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महाराजांचा विवाहसोहळा साजरा होतो.
गडावर दोन जलतळं कोयनातळे आणि कृष्णतळे. कृष्णतळ्याचं पाणी आजही पिण्यास वापरलं जातं.
वसंतगड म्हणजे इतिहास, पौराणिकता आणि निसर्ग यांचा संगम! सहकुटुंब भेट देण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण!