Shubham Banubakode
शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात प्रगत तंत्राची जोपासना केली होती.
महाराजांनी जवळपास ३०० किल्ले बांधले. यामध्ये भुईकोट, डोंगरी आणि जलदुर्ग या तिन्ही प्रकारच्या किल्ल्यांचा समावेश होता.
या किल्ल्यांची निर्मिती करण्यासाठी शिवरायांनी प्रगत बांधकामशास्त्रही विकसित करून घेतले होते.
याशिवाय महाराजांनी दारुगोळा निर्मितीसाठी कारखान्यांचीही उभारणी केली होती.
महाराजांनी दोन प्रकारचे दारूखाने वैज्ञानिक अथनि उभारले होते.
त्याकाळी दारूखाना मोगल पद्धतीने आणि पोर्तुगीज पद्धतीने उभारला जात होता.
शिवरायांनी दारूखाना उभारण्याची पोर्तुगीज पद्धत स्वीकारलेली होती.
कारण पोर्तुगीज दारुखान्यांची पद्धत मोगलांच्या दारुखान्यांच्या तुलनेत प्रगत होती.