Shubham Banubakode
कवींद्र परमानंद हे शिवाजी महाराजांच्या पदरी असणारे विद्वान कवी होते. त्यांनी महाराजांचा पराक्रम बघितला होता.
महाभारताप्रमाणेच आपण शिवरायांवरही महाकाव्य करावं, अशी त्यांची इच्छा होती.
त्यानंतर कवींद्र परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाजाराजांच्या आज्ञेनेच पहिलं महाकाव्य लिहिलं होतं.
शिवचरित्र असं या ग्रंथाचं नाव आहे. १६६१ सालापर्यंत शिवचरित्र या ग्रंथात कथन केलं आहे.
हा ग्रंथ शिवकालातील समकालीन अस्सल आणि विश्वसनीय ऐतिहासिक साधन आहे.
शिवरायांना कोण कोणत्या प्राचीन ग्रंथांचा, शास्त्रांचा व विद्यांचा तसेच कलांचा अभ्यास केला होता, याची यादीही या ग्रंथांत परमानंद यांनी दिली आहे.
या ग्रंथानुसार शिवरायांना शत्रुप्रदेशातून निसटून जाण्याची तसेच त्यांचे इंगित जाणण्याची कला, जादुगिरी, विष उतरविण्याची कला अवगत असल्याचे म्हटलं आहे.