सात दिवस चालला होता शिवराज्यभिषेक सोहळा; कोणते विधी पार पडले?

Shubham Banubakode

२९ मे : व्रतबंध व तुलापुरुषदान

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकापूर्वी व्रतबंध (मुंज) विधी शुक्रवारी पार पडला. यानंतर तुलापुरुषदान झाले. सुवर्ण, चांदी, तांबे आणि फळे, साखर यांची तुला करण्यात आली.

Shivaji Maharaj Rajyabhishek | esakal

३० मे : समंत्रक विवाह

शनिवारी शिवाजी महाराजांचे समंत्रक विवाह झाले, कारण मुंजीनंतर पूर्वीचे विवाह रद्दबातल झाले होते. सोयराबाईंना पट्टराणी म्हणून स्थान देण्यात आले.

Shivaji Maharaj Rajyabhishek | esakal

३१ मे : ऐन्द्रीशांती व अग्निप्रतिष्ठा

रविवारी ऐन्द्रीशांतीचा मुहूर्त होता. अग्निप्रतिष्ठा झाली. सर्व विधी पूर्ण झाल्यावर आचार्य आणि ऋत्विजांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली.

Shivaji Maharaj Rajyabhishek | esakal

१ जून : ग्रहयज्ञ व नक्षत्रहोम

सोमवारी ग्रहयज्ञ आणि नक्षत्रहोम विधी पार पडले. हे विधी राज्याभिषेकासाठी शुभ मानले गेले.

Shivaji Maharaj Rajyabhishek | esakal

२ जून : कोणताही विधी नाही

मंगळवारी कोणताही शुभ मुहूर्त नसल्याने या दिवशी कोणतेही धार्मिक विधी झाले नाहीत.

Shivaji Maharaj Rajyabhishek | esakal

३ जून: नहात्रयज्ञ

बुधवारी नहात्रयज्ञ विधी पार पडला, जो राज्याभिषेकाच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग होता.

Shivaji Maharaj Rajyabhishek | esakal

४ जून: निऋतियाग यज्ञ

गुरुवारी रात्री निऋतियाग यज्ञ झाला. यावेळी मांस, मत्स्य आणि मदिरा यांच्या आहुती देण्यात आल्या. यानंतर शिवाजी महाराज व सोयराबाईंनी स्नान करून पुण्याहवाचनासाठी स्थान ग्रहण केले.

Shivaji Maharaj Rajyabhishek | esakal

५ जून: मुख्य राज्याभिषेक सोहळा

शुक्रवारी त्रयोदशीच्या मुहूर्तावर सायंकाळपासून पहाटेपर्यंत मुख्य राज्याभिषेक समारंभ थाटामाटात पार पडला.

Shivaji Maharaj Rajyabhishek | esakal

६ जून : शिवराय राजा झाले

शिवाजी महाराज सुवर्णचौकीवर बसले आणि अभिषेक झाला.

Shivaji Maharaj Rajyabhishek | esakal

शिवाजी महाराजांचा सिंहासनारोहण

राज्याभिषेकादरम्यान शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान झाले. यावेळी अष्टप्रधानांनी स्थळोस्थळीच्या पवित्र जलांनी सुवर्णकलशातून अभिषेक केला.

Shivaji Maharaj Rajyabhishek | esakal

सभासदाच्या बखरीतील वर्णन

सभासदाने लिहिले, “सर्वांना नमन करून महाराज सुवर्णचौकीवर बसले. दिव्य वचने, अलंकार घेऊन सिंहासनावर विराजमान झाले.'' हा सोहळा भारतखंडासाठी ऐतिहासिक ठरला.

Shivaji Maharaj Rajyabhishek | esakal

आंबेडकरांनी रायगडावर रात्रभर केला होता मुक्काम, काय घडलं होतं भेटीत

Dr. Ambedkar's Forgotten Raigad Visit | esakal
येथे क्लिक करा