Amit Ujagare (अमित उजागरे)
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला मदत केल्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील.
त्यात कोकणातील लोकांना त्यांनी रोजगार कसा मिळवून दिला हे आपण पाहुयात.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेनंतर किल्ल्यांची बांधणी अन् आधीच्या किल्ल्यांची दुरुस्ती सुरु केली होती.
त्यातच त्यांनी महाराष्ट्राला लाभलेल्या प्रदीर्घ अशा किनारपट्टीचं संरक्षण करण्यासाठी सागरी किल्ले बांधण्याचं त्यांनी ठरवलं होतं.
सुरुवातीला दांडाराजापुरी इथल्या डोंगरावर त्यांनी एक किल्ला बांधला. त्यासाठी त्याप्रदेशातील डोंगरमाथे त्यांनी निवडले अन् त्याला तटबंदी केली.
१६५३, १६८० या काळात शिवरायांनी विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग अन् कुलाबा हे सागरी किल्ले बांधले.
महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या इतिहासात पुढच्या काळात महत्वाची भूमिका बजावलेले अनेक किनारपट्टीवरील किल्ले बांधण्याचं काम त्यांनी हाती घेतलं.
अशा प्रकारे शिवरायांनी किल्ले बांधण्याचं काम सुरु करुन कोकणच्या लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. हे किल्ले म्हणजे नौदलाचं एक अंग ठरलं.
युद्धकाळात युद्धसामग्रीचा पुरवठा करण्याची केंद्रे आणि नौदलाला युद्ध काळातील आश्रयस्थान म्हणून किल्ल्यांचा उपयोग होत असे.
'शिवकाल' या वि. गो. खोबरेकर लिखित पुस्तकातून या गोष्टींचा संदर्भ घेण्यात आला आहे.