शिवम दुबेवराचा CSK इम्पॅक्ट! स्ट्राईक रेट आकाशाला भिडलं

प्रणाली कोद्रे

आयपीएल 2024

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु असून आता रोमांचक वळणावर स्पर्धा आली आहे.

IPL Trophy | X/IPL

शिवम दुबे

आयपीएलच्या या 17 व्या हंगामात अनेक खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे, यामध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या शिवम दुबेचाही समावेश आहे.

Shivam Dube | X/IPL

चेन्नईसाठी तिसरे वर्ष

दुबेने चेन्नईकडून आयपीएल खेळण्याचे हे तिसरे वर्ष आहे. दरम्यान, चेन्नईकडून खेळताना त्याचा स्ट्राईक रेट तिन्ही वर्षात 150 पेक्षा जास्त आहे.

Shivam Dube | X/ChennaiIPL

आयपीएल पदार्पण

दुबेने 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो या संघाकडू दोन हंगाम खेळला.

Shivam Dube | X/RCBTweets

बेंगळुरूसाठीची कामगिरी

दुबेने बेंगळुरूकडून 2019 मध्ये 4 सामन्यांत 121.21 च्या स्ट्राईक रेटने 40 धावा केल्या होत्या, तर 2020 मध्ये 11 सामन्यांत 122.85 च्या स्ट्राईक रेटने 129 धावा केल्या होत्या.

Shivam Dube | X/RCBTweets

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना

त्यानंतर 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दुबेने 9 सामन्यांत 119 च्या स्ट्राईक रेटने 230 धावा केल्या होत्या.

Shivam Dube | X/rajasthanroyals

चेन्नईकडून खेळताना...

यानंतर 2022 पासून दुबे चन्नईकडून खेळत आहे. त्याने 2022 मध्ये 11 सामन्यांत 156.22 च्या स्ट्राईक रेटने 289 धावा केल्या होत्या. तसेच 2023 मध्ये 16 सामन्यांत त्याने 158.33 च्या स्ट्राईक रेटने 418 धावा केल्या होत्या.

Shivam Dube | X/ChennaiIPL

दुबेची आयपीएल 2024 मधील कामगिरी

दुबेने आयपीएल 2024 मध्ये आत्तापर्यंत (1 मे) 10 सामन्यांत 171.57 च्या स्ट्राईक रेटने 350 धावा केल्या आहेत.

Shivam Dube | X/IPL

पदार्पणात गोल्डन डक चांगला.. ऋतुराजचा अर्शिन कुलकर्णीला अनोखा सल्ला

Arshin Kulkarni - Ruturaj Gaikwad | Sakal