Puja Bonkile
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज ३५० वा राज्यभिषेक साजरा करण्यात येत आहे.
राज्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निमित्त्याने किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेकाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचे यंदाचे ३५० वं वर्षे आहे.
त्यामुळे रायगाडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना मानवंदना करण्यासाठी येतात.
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलीय.
ढोलताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे.