पंढरपूर हे असे एकमेव तीर्थक्षेत्र आहे, जेथे वर्षातून चार वेळा यात्रा भरते.

सकाळ डिजिटल टीम

पंढरपूर

पश्चिम भारतातील पंढरपूर हे एक सर्वांत प्रमुख आध्यात्मिक केंद्र असून तेथे होणाऱ्या या विशेष उत्सवामुळे ते एक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थानही आहे.

pandharpur | sakal

वर्षभरामध्ये केवळ आषाढी अन् कार्तिकीची वारी असते असा अनेकांचा समज असतो परंतु असे नसुन एका वर्षात साधारण चार वाऱ्या केल्या जातात.

pandharpur | sakal

चैत्र वारी

भारतीय सनातन हिंदू संस्कृतीनुसार चैत्र महिना हा नववर्षाचा आरंभ आहे. चैत्र शुद्ध एकादशीस 'कामदा एकादशी' म्हणतात.

pandharpur | sakal

वराह पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये कामदा एकादशीचे माहात्म्य सांगितले गेले आहे.

pandharpur | sakal

आषाढी वारी

आषाढ शुद्ध एकादशीस 'शयन' अथवा 'देवशयनी', 'पद्मा' किंवा 'विष्णुशयनी' एकादशी असे म्हणतात. यादिवशी श्रींचा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो तर पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपालकाला होतो आणि रात्री पांडुरंगाची पालखी निघते.

या एकादशीचे अधिष्ठाता भगवान श्रीकृष्ण (श्री विठ्ठल) आहेत. भगवंत या दिवशी शयन करतात. या एकादशीपासूनच 'चातुर्मासाचे' व्रत आरंभ होते.

pandharpur | sakal

कार्तिक वारी

कार्तिक शुद्ध एकादशीस 'उत्थान' एकादशीही म्हणतात. या दिवशी शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत उठतात.

pandharpur | sakal

या एकादशीनंतर चातुर्मास पूर्ण होतो, यात्रेनंतर चातुर्मासात थांबलेले लोक आपआपल्या गावी परत जातात.

pandharpur | sakal

माघी वारी

पंढरपुरात ही क्रमांक चारची महत्त्वपूर्ण यात्रा आहे. ही यात्रा माघ शुद्ध एकादशीस भरते. माघ शुद्ध एकादशीस 'जया एकादशी' म्हणतात.

pandharpur | sakal

या एकादशीचे माहात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठीर यांच्या संवादामध्ये दिले आहे. सर्व पापांचे हरण करणारी, भक्ती प्रदान करणारी ही उत्तम तिथी आहे.

pandharpur | sakal

एकमेव तीर्थक्षेत्र

पंढरपूर असे एकमेव तीर्थक्षेत्र आहे जिथे चैत्र वारी, आषाढी वारी, कार्तिकी वारी आणि माघ वारी अशा चार वेळा यात्रा होतात.

pandharpur | sakal

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखिमाईचे खास उखाणे...

pandharpur | sakal
येथे क्लिक करा