यामुळे म्हटलं जातं रामानुजन यांना गणिताचे जादुगर, जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

१. महान गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तामिळनाडूमधील इरोड येथील ब्राह्मण अय्यंगार कुटुंबात झाला. दरवर्षी त्यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरी केली जाते.

३. लहानपणापासूनच त्यांना गणितात रस होता त्यामुळे त्यांनी वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्रिकोणमितीत (Trigonometry) प्रभुत्व मिळवले.

३. कधीही कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नसतानाही, रामानुजनच्या मॉक थीटा फंक्शन्सने गणितीय विश्लेषणात क्रांती घडवून आणली, तर अत्यंत मिश्रित संख्या आणि विभाजन फंक्शन्सवरील त्यांच्या कार्याने संख्या सिद्धांतात नवीन क्षेत्रे उघडली.

४. रामानुजन यांना शासकीय कला महाविद्यालयात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती, परंतु नंतर इतर विषयांमध्ये खराब कामगिरीमुळे त्यांना त्याचा लाभ मिळू शकला नाही.

५. त्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःहून अनेक प्रमेये बनवली होती. त्यांनी गणितीय विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि अपूर्णांक यामध्ये विलक्षण योगदान दिले.

६. ट्रिनिटी कॉलेजच्या फेलोशिपसाठी निवडलेले ते पहिले भारतीय देखील होते. रामानुजांनी १९१६ मध्ये विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली आणि हार्डीच्या मदतीने त्यांच्या विषयावर अनेक शोधनिबंध प्रकाशित केले.

७. क्षयरोगामुळे २६ एप्रिल १९२०रोजी त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघे ३२ वर्षे होते.

८. २०१२मध्ये, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रामानुजन यांच्या गणिताच्या क्षेत्रातील जीवन आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी २२डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला.