Shubham Banubakode
आज शुभमन गिलची भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शुभमनच्या आवाजावरून त्याची खिल्ली उडवली जात होती.
त्याच्या आवाजाला 'बायकी आणि किनरा' असे टोमणे मारण्यात आले होते.
ती खिल्ली ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण काही वर्षांपूर्वीच शुभमन गिलने एक खास काम केले होते.
होय,'Spider-Man: Across the Spider-Verse' या चित्रपटाच्या हिंदी आणि पंजाबी आवृत्त्यांमध्ये शुभमनने आवाज दिला होता.
शुभमनने 'पवित्र प्रभाकर' या भारतीय स्पायडरमॅनच्या पात्राला आवाज दिला होता.