Aarti Badade
उकळलेल्या पाण्याची वाफ घेतल्याने चेहऱ्याची छिद्रे उघडतात. त्यामुळे चेहरा आतून स्वच्छ होतो.
बेकिंग सोडा त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास आणि छिद्रांची स्वच्छता करण्यास मदत करते.
लिंबाचा रस, मध आणि साखर यांचे मिश्रण त्वचेची स्वच्छता आणि मॉइश्चराईज करते.
ओटमील त्वचेची एक्सफोलिएशन करून छिद्रांची स्वच्छता करते. यामुळे ब्लॅकहेड्स कमी होतात.
टोमॅटो आणि हळद यांचे मिश्रण त्वचेची स्वच्छता आणि चेहरा तेजेल होण्यास मदत करते.
केळीची साल त्वचेच्या एक्सफोलिएशनसाठी उपयुक्त आहे.
हे उपाय आठवड्यातून 2-3 वेळा केल्यास ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सची समस्या कमी होण्यास मदत होईल.
उपाय सुरू करण्यापूर्वी त्वचेची संवेदनशीलता तपासण्यासाठी पॅच टेस्ट करणे उचित आहे.