Saisimran Ghashi
सध्या धावपळीच्या जगात शांत आणि चांगली झोप फार महत्वाची झाली आहे.
शांत झोपेसाठी लोक औषधे खातात, योगसने करतात पण फक्त एवढेच पुरेसे नाही.
रात्री अंथरुणावर पडताच शांत आणि चांगली झोप लागण्यासाठी काही खास पदार्थ खाणे फायद्याचे ठरते.
बदामांमध्ये मेलाटोनिन असतो, जो शरीराच्या झोपेच्या चक्राचे नियमन करण्यास मदत करतो.
गरम दूध झोपेपूर्वी पिणे आरामदायक असते, कारण त्यामध्ये ट्रिप्टोफॅन असतो जो सेरोटोनिन आणि मेलाटोनिनची पातळी वाढवतो.
हर्बल चहा प्यायल्याने लवकर झोप लागण्यास मदत करतात.
केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असतात, जे स्नायू आणि मज्जा विश्रांतीसाठी मदत करतात. यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.
या बरोबर पोटभर जेवण करणे देखील शांत झोपेसाठी खूप फायद्याचे ठरते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.