श्रावणात जास्त साप का निघतात? तज्ज्ञांनी सांगितले खरे कारण

Yashwant Kshirsagar

जुना संबंध

श्रावण महिना सुरू होताच साप मोठ्या संख्येने बाहेर पडतात अशी समजूत पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. सोशल मीडियावरही या काळात सापांचे फोटो-व्हिडिओ अचानक वाढतात.

Why Snakes Appear in Monsoon

|

esakal

नागपंचमीशी थेट संबंध?

नागपंचमी श्रावणात साजरी होते आणि नागदेवता व भगवान शिव यांना समर्पित आहे. पण साप अधिक दिसण्यामागे फक्त धार्मिक कारण आहे का? की त्यामागे विज्ञान आहे? हे जाणून घेऊया.

Why Snakes Appear in Monsoon

|

esakal

पावसाने बिळांत पाणी

श्रावणात मुसळधार पाऊस पडतो. जमिनीखालील बिळे, भेगा पाण्याने भरतात. त्यामुळे सापांना आपली सुरक्षित जागा सोडून बाहेर पडावे लागते.

Why Snakes Appear in Monsoon

|

esakal

तापमान आणिआर्द्रता

साप शीतरक्तीय प्राणी आहेत. उन्हाळ्यात ते लपून राहतात. पावसाळ्यात तापमान कमी आणि आर्द्रता जास्त असल्याने त्यांच्या हालचालींसाठी अनुकूल वातावरण तयार होते.

Why Snakes Appear in Monsoon

|

esakal

अन्नाचा शोध

पावसाळ्यात बेडूक, उंदीर आणि कीटक यांची संख्या वाढते. हे सापांचे मुख्य अन्न असल्याने ते अन्नाच्या शोधात अधिक सक्रिय होतात आणि बाहेर पडतात.

Why Snakes Appear in Monsoon

|

esakal

प्रजनन काळाचा प्रभाव

काही तज्ज्ञांच्या मते, पावसाळा हा काही सापांसाठी प्रजनन काळ असतो. जोडीदाराच्या शोधात ते अधिक फिरतात, त्यामुळे त्यांचे दर्शन वाढते.

Why Snakes Appear in Monsoon

|

esakal

नागपंचमीची धार्मिक परंपरा

या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते आणि दूध अर्पण केले जाते. या विधीमुळे कुटुंबाचे सर्पदंशापासून रक्षण होते आणि सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.

Why Snakes Appear in Monsoon

|

esakal

श्रद्धा आणि निसर्गाचा संगम

श्रावणात साप नैसर्गिकरित्या अधिक दिसतात, त्यामुळे नागपंचमीची परंपरा या निसर्गचक्राशी जुळलेली आहे. श्रद्धेने याला अधिक बळकटी मिळाली.

Why Snakes Appear in Monsoon

|

esakal

वैज्ञानिक सत्य काय सांगते?

वन्यजीव तज्ज्ञ सांगतात की, सापांचे बाहेर पडणे ही पूर्णपणे हंगामी आणि नैसर्गिक क्रिया आहे. पाऊस, आर्द्रता आणि अन्नाची उपलब्धता हे मुख्य कारणे आहेत.

Why Snakes Appear in Monsoon

|

esakal

खबरदारी महत्त्वाची

घराच्या आसपास स्वच्छता राखा, बिळे-भेगा बुजवा. साप दिसल्यास स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका. वन विभाग किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधा. निसर्ग आणि श्रद्धा दोन्हीचा आदर करा!

Why Snakes Appear in Monsoon

|

esakal

दही आणि केळी एकत्र खाल्ल्याने लैंगिक आरोग्य खरंच सुधारते का?

Banana And Yogurt Benefits

|

esakal

येथे क्लिक करा