Anuradha Vipat
अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.
कल्कि 2898 AD या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पादुकोण हे धमाका करताना दिसणार आहेत.
नुकताच या चित्रपटाचा एक कार्यक्रम मुंबईमध्ये झाला. यावेळी प्रभासची तक्रार करताना अमिताभ बच्चन दिसले.
तसेच अमिताभ बच्चन यांनी म्हटले होते की, प्रभास मला त्याच्या पाया पडू देत नाही.
नुकताच आता अमिताभ बच्चन यांनी प्रभासच्या चाहत्यांची माफी मागितली आहे.
अमिताभ बच्चन यांनी म्हटले की, प्रभासच्या सर्व चाहत्यांनी प्लीज मला माफ करावे. मी हात जोडून माफी मागत आहे. चित्रपट बघितल्यानंतर माझा जीव घेऊ नका.