सकाळ डिजिटल टीम
साबणाचा शोध कधी आणि कसा लागला व तो कोणी लावला जाणून घ्या.
History Of Soap
sakal
साबणाचा शोध एका विशिष्ट शास्त्रज्ञाने किंवा व्यक्तीने लावलेला नाही. हा तेल/चरबी (Fat) आणि राख (Ash) यांचे मिश्रण गरम करण्याच्या प्रक्रियेतून विकसित झालेला आहे.
History Of Soap
sakal
साबणासारख्या पदार्थाचे सर्वात जुने ज्ञात पुरावे प्राचीन बॅबिलोन (Ancient Babylon/मेसोपोटेमिया) येथे सुमारे इ.स.पूर्व 2800 (सुमारे 4800 वर्षांपूर्वी) सापडले असल्याचे म्हंटले जाते.
History Of Soap
sakal
बॅबिलोनमधील चिकणमातीच्या वटिकांवर (Clay Tablets) तेल आणि राख गरम करून एक मिश्रण तयार केल्याचा उल्लेख आहे, जो साबण बनवण्याचा सर्वात जुना रेकॉर्ड केलेला फॉर्म्युला मानला जाातो.
History Of Soap
sakal
सुरुवातीच्या काळात, हा साबण-सदृश्य पदार्थ कपडे धुण्यासाठी (लोकरीचे तंतू) आणि औषधी उपचारांसाठी वापरला जात होता, वैयक्तिक स्वच्छतेसाठी नाही.
History Of Soap
sakal
प्राचीन इजिप्शियन लोक (इ.स.पूर्व 1550) प्राणी आणि वनस्पती तेल अल्कधर्मी क्षारांसह (Alkaline Salts) एकत्र करून त्वचेच्या उपचारांसाठी आणि स्वच्छतेसाठी साबणासारखा पदार्थ बनवत होते.
History Of Soap
sakal
रोमन इतिहासकार प्लिनी द एल्डर (Pliny the Elder) यांनी साबणाचा शोध गॉल (Gauls- प्राचीन फ्रान्स) लोकांनी लावला आणि ते त्याचा उपयोग केस रंगवण्यासाठी करत असत, असे नमूद केले.
History Of Soap
sakal
मध्ययुगीन काळात (7 व्या शतकात) इटली, स्पेन आणि फ्रान्स मध्ये ऑलिव्ह तेल वापरून उत्तम दर्जाच्या साबणाचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले.आहे.
History Of Soap
sakal
1791 मध्ये निकॉला लब्लां यांनी साध्या मिठापासून धुण्याचा सोडा (सोडियम कार्बोनेट) बनवण्याची स्वस्त पद्धत शोधून काढली, ज्यामुळे साबण उत्पादन स्वस्त झाले आणि त्याचा वापर वाढला.
History Of Soap
sakal
Lotus National Flower
sakal