Monika Shinde
सोलापूर हे पहिले शहर ठरले जिथं भारताच्या स्वातंत्र्याच्या १७ वर्षांपूर्वीच तिरंगा नगरपालिकेवर अभिमानाने फडकवण्यात आला
२२ एप्रिल १९३० रोजी नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शेठ माणिकचंद शहा यांनी अवघ्या काही दिवसांत तिरंगा फडकवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
तिरंगा फडकवल्यामुळे ब्रिटिश सरकार संतप्त झालं. १२ मे १९३० रोजी सोलापूरमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला. कर्नल पेज यांनी झेंडा उतरवण्याचा आदेश दिला.
शहा यांनी ठामपणे उत्तर दिलं, “हे राष्ट्रीय निशाण आहे. मी तिरंगा खाली उतरवणार नाही. यासाठी सभासदांची संमती लागेल.”
ब्रिटिश अधिकच चिडले.व ब्रिटिशांनी शहा यांना अटक केली. त्यांना १० वर्ष सक्तमजुरी आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
विजापूरच्या तुरुंगात सहा महिने त्यांना कैदेत ठेवलं गेलं. तुरुंगात असताना ही त्यांनी लढा सुरूच ठेवला.
१९३० मध्येच तिरंगा फडकवणारे पहिले शहर म्हणून सोलापूरची नोंद झाली. हा इतिहास आजही अनेकांना प्रेरणा देतो.