Monika Shinde
सोलकढी म्हणजे कोकणात आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं एक थंड पेय आहे. जे जेवणानंतर पचनासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी लोकं सोलकढी पितात.
नारळाचं दूध आणि कोकम वापरून तयार होणारी ही सोलकढी स्वादिष्ट तर असतेच, पण आरोग्यासाठीसुद्धा खूप फायदेशीर असते
सोलकढी पिल्यामुळे आपलं अन्न पचायला मदत होते. खास करून मटण किंवा चिकनसारखं जड जेवण केल्यावर सोलकढी घेतली तर ते लगेच पचतं.
सोलकढी उन्हाळ्यात खूप उपयोगी आहे. ती शरीर थंड ठेवते आणि उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांपासून आराम देते. पित्त वाढलं असेल तरी सोलकढी फायदेशीर ठरते.
सोलकढीमुळे शरीरातली चरबी कमी होण्यास मदत होते. कोकमामध्ये असलेलं एक खास घटक वजन कमी करण्यास मदत करतं. तसेच नारळाच्या दुधामुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं.
सोलकढीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला तजेलदार आणि केसांना मजबूत बनवतात. नियमित सोलकढी प्यायल्याने त्वचा चमकदार दिसते.
सोलकढी प्यायल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं. कोकम आणि नारळामधले काही घटक रक्तातील वाईट चरबी कमी करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.