'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हाचे हे क्लासी लूक एकदा ट्राय करून बघाच

सकाळ डिजिटल टीम

सलमान खानच्या दबंग चित्रपटातून डेब्यू करणारी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला आजच्या काळात ओळखीची गरज नाही.

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने लोकांच्या हृदयात स्वतःसाठी एक वेगळे आणि खास स्थान निर्माण केले आहे.

अलीकडेच, तिने संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या वेब सीरिजमध्ये फरीदानची भूमिका साकारली आहे.

सोनाक्षी सिन्हा अभिनयासोबतच तिच्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेते. आज आम्ही तुम्हाला तिचे खास लूक दाखवणार आहोत.

लेहेंगा

काही काळापूर्वी अभिनेत्रीने एका फॅशन शोमध्ये हा लेहेंगा परिधान केला होता. तिचा दुपट्टा खूप खास होता आणि दुपट्ट्यामुळे तिचा लूक सुंदर दिसत होता.

साडी

काळ्या रंगाच्या या साडीमध्ये सोनाक्षी कमालीची सुंदर दिसत आहे. तिने गजरा देखील लावला आहे. तिचा लूक क्लासी ठेवण्यासाठी तिने फुल स्लीव्ह ब्लाउज घातला आहे.

बॉडीकॉन ड्रेस

या रेड डीपनेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये सोनाक्षी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिचा मेकअप न्यूड ठेवला असून केस मोकळे ठेवले आहेत.

को-ऑर्डर सेट

अभिनेत्रीचा हा कलरफुल को-ऑर्डर सेट लूक दिसायला खूपच सुंदर आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे ठेवले आहेत.