Anuradha Vipat
सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
आता शोऐबने दुसरं लग्न केल्यानंतर सानिया देखील दुसरं लग्न करणार का? असा प्रश्न देखील सानियाला विचारत आहेत.
आता एका चाहत्यांने दुसऱ्या लग्नासाठी सानियला सल्ला दिला आहे.
तसेच सानियाने नव्या आयुष्याची सुरुवात करावी असं देखील नेटकऱ्याने सांगितलं आहे.
सानिया मिर्झाच्या एका पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘सानिया नव्या आयुष्याची सुरुवात कर, पण मुस्लिम मुलासोबत लग्न करु नकोस…
घटस्फोटानंतर सानियाने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.