Saisimran Ghashi
'Special Ops' ही हेरगिरीवर आधारित वेबसीरीज OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
आता या सिरिजचा दूसरा भाग Special Ops 2 ट्रेंडला आहे
या वेबसीरीजमध्ये केके मेनन हिम्मत सिंगच्या भूमिकेत असून अनेक अभिनेत्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का, या सिरिजचा आपला लाडका अभिनेता रातोरात रस्त्यावर आलेला
टीव्ही इंडस्ट्रीमधून आलेल्या करण टॅकरने अभिनय क्षेत्रात विविध भूमिका करून आपली ओळख निर्माण केली.
करणने अभिनयापूर्वी वडिलांसोबत इंडियन गार्मेंट्स व्यवसायात काम सुरू केलं होतं.
जुहू व लोखंडवाला येथे करणने इंडियन आणि वेस्टर्न कपड्यांची विक्री करणारी दुकानं सुरू केली होती.
रिसेशनमुळे एका मोठ्या बँकेच्या कोसळण्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर झाला.
आर्थिक अडचणींमुळे त्यांना आपलं घर विकावं लागलं आणि सर्व संपत्ती गमवावी लागली.
घर गमावल्यावर करण व त्याचं कुटुंब गोदामात राहायला गेले, ही त्यांच्यासाठी अत्यंत कठीण वेळ होती.
करणने अंधारातून वाट काढत अभिनय क्षेत्रात यश मिळवलं आहे.