सकाळ डिजिटल टीम
पालक हे जीवनसत्त्वे, लोह आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध असते; पण त्याचे जास्त सेवन शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
Spinach Side Effects
esakal
योग्य प्रमाणात खाल्ल्यास फायदेशीर असणारा पालक जास्त प्रमाणात घेतल्यास काही गंभीर समस्या निर्माण करू शकतो. खाली त्याचे संभाव्य दुष्परिणाम जाणून घ्या..
Spinach Side Effects
esakal
पालक भाजीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीरात जमा होऊ शकते आणि मूत्रपिंडात खडे तयार होण्याची शक्यता वाढते. ज्यांना आधीच मूतखडा आहे, त्यांनी पालकचे सेवन मर्यादित करणे अत्यंत आवश्यक आहे.
Spinach Side Effects
पालकात आढळणारे गॉइट्रोजेन हे घटक थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये अडथळा आणू शकतात. थायरॉईडच्या रुग्णांनी पालक नियंत्रित प्रमाणात खावे.
Spinach Side Effects
esakal
पालक जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस, पोटफुगी, अपचन आणि पचनाची गती मंदावणे यासारख्या तक्रारी वाढू शकतात. त्यातील जास्त फायबर कधी कधी त्रासदायक ठरते.
Spinach Side Effects
esakal
पालक हा लोहाचा उत्तम स्रोत असला तरी ते जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात iron overload होऊ शकतो. यामुळे थकवा, डोकेदुखी, अशक्तपणा यांसारख्या समस्या दिसू शकतात.
Spinach Side Effects
esakal
पालकातील ऑक्सलेट कॅल्शियम व मॅग्नेशियम यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांचे शोषण कमी करते. त्यामुळे हाडांच्या मजबुतीवर परिणाम होऊ शकतो.
Spinach Side Effects
esakal
पालकात व्हिटॅमिन K जास्त प्रमाणात असल्याने ते रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या प्रभावावर परिणाम करू शकते. अशी औषधे घेत असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय जास्त पालक खाऊ नका.
Spinach Side Effects
esakal
आठवड्यातून २–३ वेळा पालक खाणे पुरेसे आहे.
ऑक्सलेट कमी करण्यासाठी पालक उकळून खा किंवा सूपच्या स्वरूपात वापरा.
Spinach Side Effects
esakal
Peas Side Effects
esakal