सलमान खान प्रकरणातल्या काळवीटाचा पुतळा बघितला का?

सकाळ वृत्तसेवा

काळवीट

साधारण २५ वर्षांपासून सलमान खानवर काळवीट मारल्याप्रकरणी ससेमीरा मागे लागला होता

सलमान खान

आजही लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची गँग सलमान खानच्या जीवावर उठलेली आहे

लॉरेन्स बिश्नोई

सलमानमुळेच बाबा सिद्दीकी यांच्यावर बिश्नोई गँगने गोळ्या झाडल्याचा आरोप होत आहे

पुतळा

जिथे सलमानने काळं हरिण अर्थात काळवीट मारलं, तिथेच बिश्नोई समाजाने काळवीटाचा पुतळा उभारला आहे

जोधपूर

राजस्थानमधल्या जोधपूरच्या काकाणी गावात साधारण सात बिघा जमिनीवर काळवीटाचं स्मारक उभारलं आहे

प्राणी संरक्षण

या मूर्तीची शिंगे मूळ हरणाची असल्याचं सांगितलं जातं. प्राणी संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आलेला आहे

बलिदान

या गावात इतिहासात ३६३ लोकांनी बलिदान दिलेले आहे. हा समाज प्राणी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जीव द्यायला तयार असतो

बिश्नोई गँग

काळवीटाचं प्रकरण सलमान खानच्या मागे लागलेलं आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने सलमानच्या घराबाहेर गोळीबारही केलेला होता

धमकी

सलमान आणि त्याच्या घरातील सदस्यांना यापूर्वी बिश्नोई गँगकडून अनेकदा धमक्या आलेल्या आहेत

हम साथ साथ हैं

१९९८ मध्ये हम साथ साथ हैं चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळविटाला मारण्यात आलेले होते