अचानक पाहुणे आले? मग चहासोबत द्या कुरकुरीत-चीजी मॅकरोनी बॉल्स!

Aarti Badade

खास स्नॅक्स रेसिपी

चहाच्या वेळेस किंवा मुलांच्या पार्टीसाठी 'चीजी मॅकरोनी बॉल्स' हा एक उत्कृष्ट आणि तोंडाला पाणी आणणारा पदार्थ आहे.

Macaroni Balls recipe

|

Sakal

मॅकरोनी शिजवून घ्या

प्रथम मॅकरोनी पुरेशा पाण्यात थोडे मीठ घालून मऊ शिजवून घ्या आणि त्यातील जास्तीचे पाणी गाळून बाजूला ठेवा.

Macaroni Balls recipe

|

Sakal

व्हाईट सॉसची तयारी

एका कढईत बटर गरम करा, त्यात थोडे पीठ (मैदा) घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि हलका गुलाबी होईपर्यंत परता.

Macaroni Balls recipe

|

Sakal

सॉस घट्ट करा

परतलेल्या पिठात हळूहळू दूध ओता; गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेत सॉस घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.

Macaroni Balls recipe

|

Sakal

चीज आणि मसाल्यांची जोड

तयार सॉसमध्ये भरपूर किसलेले चीज, चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड आणि लाल तिखट घालून नीट एकजीव करा.

Macaroni Balls recipe

|

Sakal

मॅकरोनी मिक्स करा

आता तयार चीज सॉसमध्ये उकडलेली मॅकरोनी घालून चांगले मिसळा आणि हे पूर्ण मिश्रण काही वेळ थंड होऊ द्या.

Macaroni Balls recipe

|

Sakal

बॉल्सला कोटिंग करा

मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे गोल बॉल्स तयार करा आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी ते ब्रेडक्रम्ब्समध्ये नीट घोळवून घ्या.

Macaroni Balls recipe

|

Sakal

सोनेरी रंग येईपर्यंत तळा

गरम तेलात मध्यम आचेवर हे बॉल्स सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या. गरमागरम मॅकरोनी बॉल्स सॉससोबत सर्व्ह करा!

Macaroni Balls recipe

|

Sakal

दररोज भाकरी खाल्लाने शरीरात कोणते बदल होतात?

Bhakri Benefits

|

esakal

येथे क्लिक करा