स्टीफन हॉकिंग: डॉक्टरांनी दोनच वर्षांचं आयुष्य सांगितलं होतं, पण त्यांनी...

संतोष कानडे

स्टीफन हॉकिंग

जगातले महान वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ब्रिटनमध्ये ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. तर त्यांचा मृत्यू १४ मार्च २०१८ रोजी झाला.

दुर्धर आजार

स्टीफन हॉकिंग यांना वयाच्या २१व्या वर्षी दुर्धर आजार झाला, त्यांना तिथून पुढे दोन वर्षांचं आयुष्य असेल, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

केम्ब्रिज विद्यापीठ

परंतु स्टीफन हॉकिंग यांनी हिमतीने आजाराशी लढा दिला आणि पुढे ५० वर्षे जगले. ते केम्ब्रिज विद्यापीठात सैद्धांतिक ब्रह्मांड विज्ञान विभागाचे संचालक होते.

मृत्यू

मृत्यूविषयी बोलताना ते म्हणाले होते, मला मृत्यूची भीती नाही. परंतु मला मरण्याचीही घाई नाही. कारण मृत्यूपूर्वी आयुष्यात खूपकाही करण्यासारखं आहे.

मोटर न्यूरॉन डिसीज

हॉकिंग यांना झालेल्या आजाराचं नाव होतं मोटर न्यूरॉन डिसीज. या आजारामुळे वयोपरत्वे अवयवांची हालचाल थांबते.

संशोधन

या आजाराचा परिणाम मेंदू आणि मज्जातंतूंवर होतो. त्यावरही स्टीफन हॉकिंग यांनी यशस्वी मात केली आणि आपलं संशोधन सुरुच ठेवलं.

अंतराळ संशोधन

स्टीफन हॉकिंग यांनी केलेलं अंतराळ संशोधन अनेक पुस्तकांमधून प्रसिद्ध झालेलं आहे.

पुस्तक

देव अस्तित्वात नाही त्यामुळे विश्वाच्या निर्मितीबद्दल ठोसकाही बोलता येत नाही, असं हॉकिंग यांनी अखेरच्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे.