संतोष कानडे
दिवंगत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी त्यांच्या अखेरच्या पुस्तकामध्ये देवाबद्दल भाष्य केलं आहे.
ते म्हणतात, देव अस्तित्वात नाही. विश्वाची निर्मिती कोणीही केलेली नाही. त्यामुळे आपल्यावर कुणाचीही सत्ता नाही.
१४ मार्च २०१८ रोजी स्टीफन हॉकिंग यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचं एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं होतं.
'ब्रिफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स' या त्यांच्या अखेरच्या पुस्तकातून त्यांनी देवाबद्दल दावा केला आहे.
तसेच त्यांनी या पुस्तकातून विश्वाची निर्मिती, परग्रहावरील जीवसृष्टी, अवकाशातील वस्ती याबद्दल विवेचन केलंय.
एवढंच नाही तर स्टीफन हॉकिंग यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेवरही या पुस्तकातून विपूल विश्लेषण केलेलं आहे.
मात्र देवाबद्दल त्यांनी केलेलं भाष्य जगभरात चर्चेचा विषय ठरलं आणि अनेकांनी त्याबद्दलचा त्यांचा दावा समजून घेण्याचा प्रयत्न केला.
देव हा प्रकारच अस्तित्वात नाही, असं स्टीफन हॉकिंग म्हणतात. त्यामुळे विश्वाच्या निर्मितीबद्दल ठोसकाही बोलता येत नाही.
मात्र पृथ्वीवर किंवा मानवावर कुणाचीही सत्ता नाही, हा मोठा दावा त्यांनी केला. कारण कुणीतरी परग्रहावरुन आपल्याला नियंत्रित करतं, असं सातत्याने बोललं जातं.