संतोष कानडे
मध्ययुगीन काळात होर्मुझ हे बंदर भारतीय व्यापाराच्या समृद्धीचे प्रवेशद्वार मानले जायचे. तिथे मौल्यवान वस्तूंचा बाजार भरायचा.
गुजरात आणि दक्षिण भारतातील व्यापारी होर्मुझच्या बाजारपेठेमध्ये वर्चस्व ठेवून असायचे. काही व्यापाऱ्यांनी या बंदरावर कायमस्वरुपी पेढ्या केल्या होत्या.
याच भारतीय व्यापाऱ्यांच्या पेढ्यांमधून जगाचा व्यापार नियंत्रित केला जात असे. मसाले, सुती कापड, मलमल, नीळ या जिन्नस युरोप आणि अरब देशांपर्यंत पोहोचवल्या जायच्या.
विशेष म्हणजे होर्मुझ हे जगातील मोत्यांच्या व्यापाराचे सर्वात मोठे केंद्र होते, जिथे भारतीय जव्हेरी मोत्यांची किंमत ठरवायचे.
महत्त्वाचं म्हणजे भारतीय मंदिरांसाठी लागणारे मौल्यवान मोती आणि दागिने याच ऐतिहासिक बंदरावरून भारतात येत असत.
भारतीय लोक आपल्या जिन्नक विकून तिथूनच रेशीम, सोने, चांदी आणि अरबी घोडे भारतामध्ये आणायचे.
गुजरात आणि मलबारवरून युरोपकडे जाणाऱ्या प्रत्येक जहाजं गोड्या पाण्यासाठी आणि इंधनासाठी तिथे थांबायचे.
होर्मुझमध्ये समुद्री चाच्यांपासून संरक्षण मिळत असे. त्यामुळेच भारतीय जहाजांचे मोठे ताफे याच सुरक्षित बंदरात आश्रय घ्यायचे.
भारतीय व्यापाऱ्यांच्या वास्तव्यामुळे होर्मुझमध्ये भारतीय मसाल्यांची चव आणि भाषा स्थानिकांच्या जीवनाचा भाग बनली होती.
होर्मुझ हे त्याकाळी भारतीय अर्थव्यवस्था आणि संस्कृतीला जगाशी जोडणारा सर्वात मजबूत दुवा होता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
पुढे पोर्तुगीजांचे लष्करी आक्रमण, व्यापाराच्या बदललेल्या समुद्री दिशा आणि पुढे १६२२ मध्ये पर्शियन व इंग्रज सैन्याने केलेल्या विनाशकारी युद्धामुळे होर्मुझचे जुने व्यापारी वैभव संपुष्टात आले.