'आयटी'चा ताण कसा करायचा कमी?

Sudesh

आयटी

सध्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात तणावाला सामोरं जावं लागत आहे. ही परिस्थिती पुढे आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

Stress Management Tips | eSakal

धोका

या ताणामुळे कित्येक व्यक्तींना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक आयटी कपल्सचे संसार यामुळे तुटत आहेत.

Stress Management Tips | eSakal

रिप्रोग्रॅमिंग

या तणावाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला मेंदूचं रिप्रोग्रॅमिंग करायला हवं, असं मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विद्याधर बापट यांनी व्यक्त केलं.

Stress Management Tips | eSakal

समजून घ्या

तज्ज्ञ सांगतात, की आपण आपला ताण ओळखायला हवा. कोणत्या गोष्टीची काळजी वा भीती वाटते, कशामुळे राग येतो अशा गोष्टींची नोंद ठेवा.

Stress Management Tips | eSakal

स्वयंसूचना

ऑफिसचे आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य वेगवेगळं ठेवण्यासाठीचं तंत्र जाणून घ्या. स्विच ऑन-स्विच ऑफ तंत्र शिकण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या.

Stress Management Tips | eSakal

नाती

आपल्या आयुष्यातील इतर व्यक्तींसोबतची नाती जपा. विशेषतः जोडीदाराला ठरवून वेळ द्या. त्याच्या वा तिच्या मनस्थितीचा विचार करा.

Stress Management Tips | eSakal

व्यायाम

मानसिक आरोग्यासाठी देखील व्यायाम महत्त्वाचा आहे. कार्डिओ, पोहणं, धावणं अशा प्रकारचे व्यायाम नैसर्गिक अँटी डिप्रेसंट म्हणून काम करतात.

Stress Management Tips | eSakal

छंद

संगीत ऐकणं, पेंटिंग करणं, फोटोग्राफी करणं किंवा फिरायला जाणं.. तुम्हाला जे काही आवडत असेल त्यासाठी वेळ काढा.

Stress Management Tips | eSakal

तणावामुळेही होऊ शकतो कॅन्सर? काय सांगतात तज्ज्ञ?

Cancer And Stress | eSakal