सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
अशा परिस्थितीत आज आपण जाणून घेऊया की, दिवसातून किती लवंग खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात, लवंग निरोगी पचन राखण्यास आणि संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते.
लवंगाचा स्वभाव उष्ण असतो, म्हणून उन्हाळ्यात 1 किंवा 2 लवंगा खाणे पुरेसे असते.
सकाळी लवंग कोमट पाण्यासोबत किंवा चावून खाऊ शकता.
रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पोट स्वच्छ राहते आणि गॅसची समस्या कमी होते.
लवंग सर्दी आणि खोकल्यापासून आराम देते आणि तोंडाची दुर्गंधी देखील दूर करते.
ज्यांना उन्हाळ्यात अॅसिडिटी किंवा पित्ताचा त्रास होतो, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच लवंग खावी.
जास्त लवंगा खाल्ल्याने पोटदुखी, डोकेदुखी किंवा अॅलर्जी होऊ शकते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.