Summer Skincare : उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा 'हे' कुलिंग फेसपॅक, त्वचेवर येईल ग्लो

Monika Lonkar –Kumbhar

उन्हाळा

सध्या एप्रिल महिन्यातच उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. या उन्हापासून बचाव करण्यासाठी आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.

त्वचेच्या समस्या

उन्हाच्या तीव्र झळांमुळे त्वचेवर रॅशेस येणे, त्वचा लाल पडणे आणि त्वचा टॅन होणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात.

त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला कुलिंग फेसपॅक्सबद्दल सांगणार आहोत. या फेसपॅकच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यात त्वचेची नीट काळजी घेऊ शकाल.

पुदिना-दह्याचा फेसपॅक

पुदिना आरोग्यासोबतच त्वचेसाठी फायदेशीर आहे. पुदिना-दह्याचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी पुदिन्याच्या पानांची बारीक पेस्ट करा.

आता पुदिन्याची पेस्ट अर्धी वाटी दह्यामध्ये मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. १५-२० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

चंदन आणि गुलाबजल

त्वचेसाठी चंदन आणि गुलाबजल फायदेशीर आहे. हा फेसपॅक बनवण्यासाठी २ चमचे चंदन पावडर घ्या.

या चंदन पावडरमध्ये २ चमचे गुलाबजल मिसळा आणि अर्धा चमचा मध मिसळा. हा फेसपॅक चेहऱ्याला लावा १५-२० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.

Eye Makeup Tips : उन्हाळ्यात डोळ्यांना काजळ लावताना अशी घ्या काळजी

Eye Makeup Tips | esakal