थंडावा देणाऱ्या उन्हाळी 7 रानभाज्या

सकाळ डिजिटल टीम

चिवई

बेसनासोबत बनवलेली ही रानभाजी शरीराला बळकटी देते. फायबरमुळे बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय. 'फुनके'सारख्या पौष्टिक पाककृतींसाठी उत्तम.

Summer wild vegetables | esakal

कोलार

कांचन झाडाच्या कोवळ्या पानांची भाजी. फायबर व जीवनसत्व अ समृद्ध. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी नैसर्गिक देणगी.

Summer wild vegetables | esakal

कुड्याची फुलं

कडसर पण गुणकारी. पचनशक्ती वाढवते, यकृत व आतड्यांचे आरोग्य सुधारते. त्वचेसाठी उपयुक्त.

Digestion | esakal

लाल माठ

ती व्हिटॅमिन ए, सी, के आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, तसेच फायबरचे प्रमाणही अधिक असल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. 

Summer wild vegetables | esakal

तांदुळजा

ही भाजी रक्त शुद्ध करते, डोळे, केस आणि हाडांसाठी चांगली आहे, तसेच उष्णतेच्या आजारांवर उपयुक्त आहे. 

Summer wild vegetables | esakal

सुरणफुलं (रान फुलं)

सुरणाच्या झाडाची रानफुलं. आयरन व फॉलिक अॅसिड भरपूर. हिमोग्लोबिन वाढवणारी आणि सौंदर्य वृद्धिंगत करणारी भाजी.

Hemoglobin | esakal

टाकळा

हृदयासाठी लाभदायक. कोलेस्टेरॉल कमी करणारी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणारी ही भाजी उन्हाळ्यात अनमोल.

Summer wild vegetables | esakal

उन्हाळ्यात माठातले पाणी प्यायल्याने काय होते?

Drink Water from an Earthen Pot in Summer | esakal
येथे क्लिक करा