निरोपाची वेळ... सुनील छेत्रीची शेवटच्या सामन्याआधी भावुक पोस्ट

प्रणाली कोद्रे

निवृत्ती

भारतीय फुटबॉल संघाचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने मे महिन्यात निवृत्तीची घोषणा केली होती.

Sunil Chhetri | X/IndianFootball

शेवटचा सामना

सुनील छेत्रीने सांगितले होते की 6 जून रोजी कुवेतविरुद्ध होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीतील सामना त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

Sunil Chhetri | X/IndianFootball

भावनिक सामना

त्यामुळे आता कोलकातामधील सॉल्ट लेक स्टेडियवर होणाऱ्या कुवेत विरुद्धचा सामना सुनीलसाठीच नाही, तर भारतीय क्रीडा क्षेत्रासाठीही भावनिक ठरणार आहे.

Sunil Chhetri | X/IndianFootball

भावुक पोस्ट

दरम्यान, सुनील छेत्रीने हा सामना खेळण्याच्या एक दिवस आधी एक भावूक पोस्ट केली आहे.

Sunil Chhetri | X/IndianFootball

फोटो

त्याने स्टेडियमकडे पाहात असतानाचा त्याचा पाठमोरा उभा असलेला फोटो पोस्ट केला आहे.

Sunil Chhetri | Instagram

कॅप्शन

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने निरोपाची वेळ झाली, अशा अर्थाने Alright, then असे लिहिले आहे.

Sunil Chhetri | Sakal

लाईक्सचा पाऊस

त्याच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत, तसेच लाखो लाईक्स आल्या आहेत.

Sunil Chhetri | X/IndianFootball

19 वर्षांचा प्रवास

2005 साली आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केलेला सुनील छेत्री 19 वर्षांनंतर त्याचा हा प्रवास संपणार आहे.

Sunil Chhetri | X/IndianFootball

गोल

त्याने 150 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने 94 गोल केले आहेत. तो 87 सामने कर्णधार म्हणून खेळलाय.

Sunil Chhetri | X/IndianFootball

KKR चा अष्टपैलू अडकला लग्नबंधनात, पाहा फोटो

Venkatesh Iyer - Shruti Raghunathan | Instagram