IPL: सर्वात कमी ओव्हरमध्ये कोणत्या संघानं सेंच्युरी केलीये?

प्रणाली कोद्रे

सनरायझर्स हैदराबादचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेतील 35 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 67 धावांनी विजय मिळवला.

Travis Head | Sakal

विक्रमाला गवसणी

याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

Travis Head - Abhishek Sharma | Sakal

ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माचं वादळ

सनरायझर्स हैदराबादचे सलामीवीर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी संघाला अवघ्या 5 षटकातच 100 धावांचा टप्पा पार करून दिला होता.

Travis Head - Abhishek Sharma | Sakal

सनरायझर्स हैदराबादचा विक्रम

त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी षटकात संघाच्या 100 धावा होण्याचा विक्रम सनरायझर्स हैदराबादच्या नावावर नोंदवला गेला.

Travis Head - Abhishek Sharma | Sakal

चेन्नई अन् कोलकाताचा विक्रम

यापूर्वी हा विक्रम चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नावावर होता.

Travis Head - Abhishek Sharma | X/IPL

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स

चेन्नई सुपर किंग्सने 2014 साली 6 षटकातच पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात 100 धावा पूर्ण केल्या होत्या.

Suresh Raina | Sakal

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

तसेच कोलकाता नाईट रायडर्सने 2017 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात 6 षटकात 100 धावा पार केल्या होत्या.

Sunil Narine - Chris Lynn | Sakal

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावरही चेन्नई सुपर किंग्स असून त्यांनी 2015 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 6.5 षटकात 100 धावांचा टप्पा पार केला होता.

Brendon McCullum | Sakal

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स

तसेच सनरायझर्स हैदराबादने 2024 मध्येच मुंबई इंडियन्सविरुद्ध 7 षटकात 100 धावांचा टप्पा पार केला होता.

Travis Head | X/IPL

धोनीने IPL इतिहासात पहिल्यांदाच मारला 'तसा' षटकार

MS Dhoni | CSK | IPL | Sakal