संतोष कानडे
दोन महिन्यांपासून सुरेश धस हे मीडियाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेले आहेत. संतोष देशमुख खून प्रकरण त्यांनी उचलून धरलं आहे.
सुरेश धस हे बीड जिल्ह्यातल्या आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघाचे विधानसभा आमदार आहेत
यापूर्वी सुरेश धस हे विधान परिषदेवर होते. बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी म्हणून ते विधान परिषदेत गेले होते
१९९२ पासून सुरेश धस हे राजकारणात आहेत. १९९९ ते पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून गेले
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत धस हे भाजपमध्ये काम करत होते.
१९९९ पुढे २००४ आणि २००९ मध्ये धस यांचं आष्टी मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होतं
२००४ नंतर त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता
२००९ ते २०१४ या कालावधीत साधारण १८ महिने धसांकडे महसूल राज्यमंत्री पद होतं
२०१४ मध्ये सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात उतरले. तेव्हा गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांचा पराभव केला.
२०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्येही धस पराभूत झाले. पुढे त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. त्यामुळे ते थेट २०२४ मध्ये पुन्हा विधानसभेत निवडून गेले आहेत.
महिन्याभरापासून धस हे वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगबद्दल बोलत आहेत. त्यामुळे त्यांना भीती वाटत नाही का? असा प्रश्न पडतो. परंतु शून्यातून विश्व निर्माण केलेल्या धसांना न्यायापुढे कशाचीच पर्वा नाही. हे त्यांनी बोलून दाखवलं.