Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होणार आहे.
या स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन झाले असल्याने सर्वच संघात मोठे बदल झाले आहेत.
पण असे असले तरी सर्वच संघांनी आपल्या काही प्रमुख खेळाडूंना रिटेनही केले आहे.
मुंबई इंडियन्सनेही हार्दिक पांड्या - रोहित शर्मा या आजी-माजी कर्णधारांसह सूर्यकुमार यादव , जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा यांना संघात रिटेन केलं.
आता गेल्यावर्षी तळात राहिलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात चांगल्या पुनरागमनाची अपेक्षा आहे.
दरम्यान,सूर्यकुमार यादव याने आगामी आयपीएलबाबतही आपले मत व्यक्त केले.
तो म्हणाला, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा व मी स्वत: असे चार कर्णधार मुंबई इंडियन्स संघात खेळत आहेत; पण आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेतो. आपल्या संघाला कशाप्रकारे पुढे न्यायचे याचा विचार करतो.
मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० साली आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.