सकाळ डिजिटल टीम
भारतीय इतिहासातील विचारवंत आणि अध्यात्मिक गुरु म्हणून स्वामी विवेकानंद यांना ओळखले जाते. बंगालमधील कोलकाता येथे १२ जानेवारी १८६३ मध्ये विवेकानंदांचा जन्म झाला.
स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त असे आहे. स्वामी विवेकानंद यांनी जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीचे महत्त्व पोहचवले.
स्वावी विवेकानंद हे अध्यात्मिक गुरू असले तरी ते खवय्ये देखील होते आणि मासांहारी जेवणही करायचे.
काही उपलब्ध असलेल्या साहित्यातून मिळणाऱ्या माहितीनुसार विवेकानंद यांना मासे आणि मटण खायला आवडायचे.
ते बंगाली असल्याने आणि कायस्थ समुदायातील असल्याने मासांहार करायचे.
'द कम्प्लिट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद' यात असलेल्या माहितीनुसार विवेकानंद यांनी म्हटले होते, 'जीव घेणे नि:संशय पाप आहे, परंतु, जोपर्यंत रसायनशास्त्रातील विकासाने शाकाहारी अन्न मानवी व्यवस्थेसाठी योग्य बनत नाही, तोपर्यंत मांसाहाराशिवाय दुसरा पर्याय नाही.'
पुढे लिहिले की 'जो व्यक्ती दिवस-रात्र काबाडकष्ट करत आहे त्याच्यावर शाकाहार लादणे, हे आपण स्वातंत्र्य गमावण्याचे एक कारण आहे.'
स्वामी विवेकानंद यांना कचोरी-भाजीही आवडायची. जेवणानंतर ते आईस्क्रीमही खायचे.
असंही म्हटलं जातं की स्वामी विवेकानंद यांना चहा देखील आवडायचा.
त्यांना जेवण बनवायलाही आवडायचे. ते तूप आणि साखरेचा वापर करून पुलाव देखील करायचे.