सकाळ डिजिटल टीम
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
स्वप्नील आणि प्रसाद यांच्या जोडीचा आगामी चित्रपट 'जिलबी' १७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
'जिलबी' चित्रपटाची रहस्यमय कथा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल, असे निर्माते आणि कलाकार सांगतात.
स्वप्नील जोशी म्हणतात, “माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याचा अनुभव मिळाला आहे. विजय करमरकर ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”
प्रसाद ओक म्हणतात, “स्वप्नीलसोबत काम करण्याची इच्छा 'जिलबी'मुळे पूर्ण झाली.”
चित्रपटात शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव आणि प्रणव रावराणे यांसारख्या कलाकारांची उपस्थिती आहे.
चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित आणि रूपा पंडित आहेत, आणि कलादिग्दर्शन कौशल सिंग यांनी केले आहे.
चित्रपट आज प्रदर्शित होणार झाला आहे, आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.