सकाळ डिजिटल टीम
ई-बाईक खराब होऊ नये म्हणून अन्य वाहनांप्रमाणेच नियमित तपासणी गरजेची आहे. रस्त्यावर जाताना बोल्ट सैल होऊ शकतात. किरकोळ बाबी वेळेत दुरुस्त केल्यास वाहन दीर्घकाळ टिकते.
बॅटरी दीर्घकाळ टिकण्यासाठी दिशानिर्देशानुसार चार्ज करा आणि ती जास्त उष्णतेत ठेवू नका. गरजेनुसार वाहनाच्या बाहेर कोरड्या ठिकाणी बॅटरी ठेवा.
सुरक्षित राइडसाठी टायरमध्ये हवा पुरेशी असावी. मॅन्युफॅक्चरने दिलेल्या निर्देशानुसार हवा भरावी. वाहन सतत वापरत असल्यास टायर चांगल्या स्थितीत राहतो.
वर्षातून दोनदा ई-बाईकची सर्व्हिसिंग करा. बेल्ट आणि ब्रेक यावर विशेष लक्ष द्या. दर ५००० किमी नंतर किंवा आवश्यकतेनुसार लवकर सर्व्हिसिंग करा.
ई-बाईकसाठी विमा असणे अत्यंत आवश्यक आहे. बॅटरी आणि वाहनाचा विमा घेतल्यास आर्थिक आणि मानसिक आधार मिळतो.
पेट्रोल बाईकच्या तुलनेत ई-बाईकची देखभाल कमी खर्चिक आहे. इंजिन, गिअरबॉक्स नसल्यामुळे खर्च आणि वेळ वाचतो.
ब्रेक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ब्रेक नियमित तपासून त्याची स्थिती बघा, सुरक्षित प्रवासासाठी ब्रेक योग्य स्थितीत असणे आवश्यक आहे.
ई-बाईकची मोटर कार्यरत ठेवण्यासाठी दररोज किंवा आवश्यकतेनुसार तिची तपासणी करा. ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे ज्यामुळे वाहनाची कामगिरी सुधारते.