निखळ त्वचेसाठी चिंचेपासून बनवा फेसपॅक्स

Monika Lonkar –Kumbhar

चिंच

आंबटगोड चिंच खायला सगळ्यांनाच आवडते.

ही आंबटगोड चिंच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. अनेक खाद्यपदार्थांमध्ये चिंचेचा आवर्जून वापर केला जातो.

त्वचेसाठी

आरोग्यासाठी फायदेशीर असणारी चिंच त्वचेसाठी देखील तितकीच उपयुक्त आहे. चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही चिंचेपासून काही फेसपॅक्स बनवू शकता.

चिंच आणि लिंबूचा फेसपॅक

पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी हा फेसपॅक फायदेशीर आहे. हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी अर्धी वाटी चिंच पाण्यात भिजत घाला.

त्यानंतर, एका बाऊलमध्ये चिंचेचा कोळ काढून घ्या. आता या चिंचेच्या कोळामध्ये २ चमचे लिंबाचा रस मिसळा. तुमचा फेसपॅक तयार आहे. चेहऱ्यावर आणि मानेवर २० मिनिटांसाठी फेसपॅक लावा. नंतर, चेहरा धुवा.

चिंच, मध आणि दह्याचा फेसपॅक

हा फेसपॅक बनवायला अतिशय सोपा आहे. सर्वात आधी अर्धी वाटी चिंच पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजत ठेवा. त्यानंतर, एका बाऊलमध्ये चिंचेचा कोळ काढून घ्या.

आता या चिंचेच्या कोळामध्ये २ चमचे दही आणि १ चमचा मध मिसळून त्याची पेस्ट तयार करून घ्या. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेजवळ १५-२० मिनिटांसाठी लावा.

आता थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला चेहऱ्यावर सुंदर ग्लो दिसेल.

तजेलदार त्वचेसाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर आहे किवी

Benefits Of Kiwi | esakal