Yashwant Kshirsagar
पहिल्या स्वातंत्र्ययुद्धातील प्रमुख नायकांपैकी एक असलेले स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे हे केवळ भारतीयांसाठीच नाही तर ब्रिटिशांसाठीही अविस्मरणीय आहेत.
या महान स्वातंत्र्य सेनानीचे शौर्य आजही लक्षात ठेवले जाते, परंतु त्यांच्याशी संबंधित अनेक वस्तू अजूनही लंडन संग्रहालयात आहेत.
तात्या टोपे ह्यांना शिवपुरी येथे फाशी दिले. मानसिंग नावाच्या एका फितूरामुळे तात्या पकडले गेले.
तात्या टोपे यांना १८ एप्रिल १८५९ रोजी संध्याकाळी शिवपुरीतील एका कडुलिंबाच्या झाडावर फाशी देण्यात आली.
मृतदेह दुसऱ्या दिवसापर्यंत झाडावर लटकत राहिला. यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण होईल आणि कोणताही देशभक्त ब्रिटीश राजवटीविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न करणार नाही असा उद्देश इंग्रजांचा होता.
फाशी झाल्यावर तात्यांच्या मृतदेहावरून ब्रिटीशांनी यांची डोक्यावरील केसांची बट आणि कपडे लंडनला पाठवले.
त्यांच्या डोक्यावरील केसांची एक बट कापून घेण्यात आली होती. लंडनमधल्या नॅशनल आर्मी म्युझियममध्ये आजही ती जपून ठेवलेली आहे.