सकाळ ऑनलाईन
चहा प्यायल्यानं त्याचा दातांवर त्याचा विपरित परिणाम होतो, असं आजवर आपण ऐकलं असेल पण नेमका परिणाम होतो की नाही? जाणून घेऊयात.
काही डेन्टिस्टनं याबाबत वेगळी मतं मांडली आहेत.
चहामध्ये साखर असल्यानं त्याचा थर दातांवर साचतो, त्यामुळं तोंडातील बॅक्टेरियांमुळं दातांवर ते प्रक्रिया करायला सुरुवात करतात. त्यामुळं खरंतर चहा प्यायल्यानंतर चूळ भरणं गरजेचं आहे.
चहा गरम असल्यानं दातांच्या तीन थरांपैकी सर्वात वरच्या इनॅमलला इजा पोहोचू शकते. त्यामुळं दात किडण्याची प्रक्रिया वेगानं होऊ शकते.
खूप जास्त प्रमाणावर चहा पित असाल तर दातांवर टॅनिनमुळं केमिकल प्रक्रिया होऊन दात पिवळे पडू शकतात.
चहा प्यायल्यानंतर तोंडाला काहीशी दुर्गंधी निर्माण होते, त्यामुळं अनेकजण चहा प्यायल्यानंतर बडिशेप किंवा माऊथ फ्रेशनर खातात.
चहा प्यायल्यानंतर लगेचच चूळ भरल्यानं दातांवर काहीही परिणाम होत नाही उलट दातांवर साचलेला गोड थर त्यामुळं लगेच दूर होतो, त्यामुळं किडीपासून संरक्षण होतं.
फक्त गरम चहा प्यायल्यानंतर लगेचच थंड पाण्यानं चूळ भरल्यास त्यामुळं दाताला इजा होऊ शकते, म्हणून चहा प्यायल्यानंतर एखाद दोन मिनिटं थांबून तुम्ही चूळ भरु शकता.